image

‘Jubilee Hope Walk for Couples’ held in the Diocese of Vasai

Vasai, January 29, 2025 - The "Hope Walk for Couples" at Our Lady of Fatima Church, Chulne, Diocese of Vasai, brought together 45 couples in a moving display of unity, faith and love on January 25, 2025. Conceived by Fr. Robert Gonsalves and inspired by Fr. Baptist Lopes, the event was organized by the Family Committee (Kutumb Samiti) to offer couples an opportunity to reflect on their journeys together.


This unique event brought couples together under the soft glow of candlelight and the shelter of umbrellas, symbolizing resilience and shared strength in the storms of life. The theme of the evening revolved around prayer and gratitude, as couples united in a collective plea for a "rain of blessings." The umbrella, often seen as a metaphor for protection and faith, became a symbol of hope, reminding everyone that faith helps weather the storms of life.


The event culminated with a heartfelt prayer led by Fr. Baptist, the Parish Priest of Our Lady of Fatima Church, Chulna. Couples were invited to hold hands, exchange words of gratitude, and reaffirm their commitment to one another and to the family of Christ’s Church. Fr. Baptist encouraged couples to appreciate their shared strengths and weaknesses, support each other during life's ups and downs, and thank God for the blessings of love and companionship.


This reflective and spiritually enriching evening resonated deeply with the participants. Some even suggested organizing such events regularly to foster stronger bonds and mutual understanding among couples.


The "Jubilee Hope Walk for Couples" was not just a physical journey but an inward emotional and spiritual journey. It left an indelible mark on the hearts of those who participated, emphasizing the importance of love, unity, faith and relying on God’s unconditional love, mercy & forgiveness and inspiring everyone to do the same as Pilgrims of Hope, now and ever.


By Smita Robert Lopes-D’Costa


(Translation in Marathi)

दाम्पत्यांसाठी आशेची पदयात्रा: प्रेम आणि कृतज्ञतेचा प्रवास


२५ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी, "दाम्पत्यांसाठी आशेची पदयात्रा" हा एक आगळावेगळा आणि आशा, विश्वास व एकतेचा संदेश देणारा कार्यक्रम ४५ जोडप्यांसाठी विशेष अनुभव ठरला.

 

फा. बॅर्टीस्ट ह्यांच्या प्रेरणेतून व फा रॅाबर्ट गोन्सील्वीस ह्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व अवर लेडी ऑफ फातिमा चर्चच्, चुळण्याच्या कुटुंब समितीने आयोजित केलेला हा अनोखा उपक्रम जोडप्यांना मेणबत्त्यांच्या सौम्य प्रकाशात व छत्रीच्या आच्छादनाखाली एकत्र आणणारा ठरला. या छत्र्या त्यांच्या आयुष्यातील वादळांचा सामना करण्यासाठीच्या जिद्दीचे व सामर्थ्याचे प्रतीक बनल्या.

 

जोडपी जेव्हा तलावाच्या काठावर चालू लागली, तेव्हा वातावरण सौम्य आणि प्रेमळ झाले होते. चणा शेंगदाण्या सारख्या हलक्या फुलक्या स्नॅकने मुंबईच्या चौपाटीच्या आठवणी जागवल्या व या सांस्कृतिक आणि आनंददायी क्षणाला रंगत आणली. हातात हात धरून चालत असताना, प्रत्येक जोडप्याने आपली जीवनयात्रा आठवली—आनंदाचे, आव्हानांचे आणि परस्पर आधाराचे क्षण पुन्हा अनुभवले.

 

या संध्याकाळीचा मुख्य विषय प्रार्थना आणि कृतज्ञता होता. सर्व जोडप्यांनी एकत्र येऊन अप्रत्यक्षरीत्या "आशेचा आशीर्वाद बरसण्यासाठी" सामूहिक प्रार्थना केली. छत्री हा संरक्षण व विश्वास याचा प्रतीकात्मक अर्थ उचलून धरत, प्रत्येकाने जीवनाच्या वादळांना तोंड देण्यासाठीच्या श्रद्धेची जाणीव केली.

 

कार्यक्रमाची सांगता चुळणा चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर बाप्टिस्ट लोपिस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रार्थनेने झाली. त्यांनी जोडप्यांना हातात हात धरायला सांगितले, परस्परांचे आभार मानायला व आपल्या नात्यावरील प्रेमाची पुनःप्रतिज्ञा व्यक्त करायला प्रोत्साहित केले. फादर बाप्टिस्ट यांनी जोडप्यांना त्यांच्या सामर्थ्य व कमकुवतपणाचा स्वीकार करून, जीवनातील सुखदुःखात एकमेकांना साथ देण्याचे महत्त्व सांगितले. देवाचे आभार मानत, या नात्याच्या आशीर्वादासाठी धन्यवाद द्यायला सांगितले.

 

हा आत्ममंथन करणारा आणि आध्यात्मिक दृष्टिकोन देणारा संध्याकाळ प्रत्येक सहभागी जोडप्याच्या मनाला भावला. अनेकांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली आणि सांगितले की, हा क्षण आम्ही खूप दिवसांपासून शोधत होतो. अशा कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे व्हावे, जेणेकरून दाम्पत्यांतील नाते अधिक दृढ होतील.

 

"दाम्पत्यांसाठी आशेची पदयात्रा" हा केवळ शारीरिक प्रवास नव्हता तर भावनिक व आध्यात्मिक प्रवासही ठरला. ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला त्यांच्या मनात हा कार्यक्रम कायम स्मरणात राहील; प्रेम, एकता आणि विश्वास यांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरेल, तसेच प्रमेश्वराच्या अनंत प्रेम, करुणा व दयेवर विसंबून राहण्यास व इतरांसाठी आपल्या अंतरणात ह्याच भावनां जपण्यास प्रेरणा ठरेल ह्याविषयी कुणाच्याही मनात तीळमात्र शंका नाही.

 

स्मिता रॅाबर्ट लोपीस-डिकोस्टा

चौक, चुळणे

© 2025 CATHOLIC CONNECT POWERED BY ATCONLINE LLP